प्रस्तावना

मराठी माणसांचे स्वागत असो!

 

या बेबसाईटवर मराठीत लेख लिहिण्यात मला अत्यंत आनंद होत आहे. जमीन या विषयावर महाराष्ट्राकरीता एखादी वेबसाईट आहे का याचा शोध मी गेली पाच वर्षै करत होतो. शेवटी, आपण का इतरांची वाट बघायची? आपणच का सुरू करू नये? असा विचार करून सन २००८च्या सुरवातीला ही वेबसाइट मी चालू केली. पहिल्याच  वर्षात  या वेबसाइटला १8००० पेक्षा अधिक लोकांनी भेट दिली. अनेकांनी फोन करून माझे अभिनंदन केले व मराठीतही मजकूर लिहावा असा आग्रह धरला. वाचकांनी दिलेल्या प्रोत्साहनातून मला मराठीत लिहीण्याची प्रेरणा मिळाली आहे.

 

इंग्रजी भाषेत जे काही मी लिहीलेले आहे त्याचे सरळ भाषांतर मराठीत असणार नाही. आणि आपल्याच माणसांबरोबर बोलत असताना कायदेशीर भाषा शक्यतो वापरायची नाही असे मी ठरविले आहे.

 

जमीन विकासक म्हणून काम करत असताना जमीन खरेदी करण्यापासून जमीन विक्री करण्या पर्यतची सर्वच कामे मला करावी लागली. ही कामे करत असताना आलेल्या  अडचणींमुळे अनेक वेळा माझे कष्ट व पैसे वाया गेलेले आहेत. हा अनुभव लहान किवा मोठया  जमीनीचा व्यवहार करणार्‍या सर्वांना येतो. असे का घडते याची कारणे आपण समजून घ्यायला हवीत त्याकरीता जमीनीचे आपल्या जीवनात नक्की स्थान काय आहे ते आपण पाहूया.

 

मातीतून येशी मातीत मिळशी हे सुप्रसिध्द वचन जमीन आणि माणूस यांचा नाते संबंध स्पष्ट करतो. ज्या जमीनीवर आपला जल्म होतो तीला आपण गौरवाने आपली मातृभुमी  म्हणून संबोधतो. आमच्या साहीत्यातही आमचा उल्लेख धरतीची लेकरे म्हणून होतो म्हणूच आमच्या  भावनीक जीवनात जमीनीला स्थान असते. अन्न,वस्त्र व निवार्‍याची गरज आमची ही जननी भागवते. आम्ही कितीही आधुनिक  जगात जगलो तरी आमच्या या आईची ओढ आम्हाला पुन्हा पुन्हा निसर्गाकडे घेऊन जाते.

 

व्यवहारीक जगात जेवढ्या जास्त जमीनीवर कब्बा तेवढी अधिक समृध्दी आणि  परीणामतः तेवढी अधिक प्रतिष्ठा. प्राचीन काळापासून राज्याच्या सिमेवरून युध्द झालेली आहेत. जमीनीच्या प्रश्नावरुन नाते संबंधात कटूता निर्माण झालेली आहे. भुमिहीन व जमिनदार यांचे झगडे झालेले आहेत. राज्यकर्त्यांनाही बहूजन समाजाचा विचार करून जमीनीचे फेरवाटप  करावयास लागलेले आहे.

 

वरील विवेचनावरून असे दिसून येते की, जमीन हा विषय सामाजीक आर्थिक व राजकीय पातळीवरून हाताळावा लागतो. या तीन्ही बाबींचा प्रभाव जमीन विषयक कायदे करताना झालेला आहे. आणि याच कारणाने जमीन हा विषय क्लिष्ट व गुंतागूतीचा  झालेला आहे.

 

आपल्या कामापूरता आवश्यक ते ज्ञान असले की, आपले काम होते. हे ज्ञान मिळविण्याकरीता नक्की काय करावयाला हवे याचा आता  विचार आपण करुया.

जर आपणास

1. आपल्या पूर्वापार असलेली जमीनीचा शोध घ्यायचा असेल

2. जमीन नावावर करून घ्यायची असेल,

3. असलेल्या जमीनीचे वाटप करावयाचे असेल,

4. जमीनीचा सर्व्हे करावयाचा असेल,

5. नविन जमीन खरेदी करण्याकरीता शोधायची असेल,

6. जमीन खरेदी करावयाची असेल,

7. जमीनीचा बिनशेती विकास करावयाचा असेल,

8. व जमीन विकावयाची असेल

तर या सर्व बाबी करण्या करीता कोणते कायदे लागू होतात याची माहिती करून घेण्याची आवश्यकता आहे. तसेच आपल्या कामा पूरता कायद्दाची ओळख करून घेणे आवश्यक आहे. या वेबसाइटवर आपणास ही सर्व माहिती प्राथमीक स्वरूपात  उपलब्ध होणार आहे.

आपणास आपले काम करून घेण्यासाठी वेगवेगळ्या सरकारी खात्यात फेर्‍या मारावयास लागतात. अनेकवेळा साध्या गोष्टींकरीता अख्खा दिवस मोडावा लागतो. सरकारी कामकाजाची पध्दत व त्याच्या आपल्या कामासंबंधीच्या कर्तव्यांची  कल्पना नसते. सर्वात सोपा मार्ग म्हणजे लाच देऊन  काम करून घेणे असे वाटत असते. काही वेळा हा मार्ग अत्यंत तोट्याचा ठरतो. या वेबसाइटवर विविध प्रकरणां करीता कोणते अर्ज करावयाचे व त्या प्रकारणांची  खात्या अंतर्गत काय कारवाई असते याची माहिती दिली जाणार आहे.

 

आपण जमीनीचे प्लॉट पाडून विकसित करून विकावयाच्या व्यवसायात पर्दापण करू इच्छीत असाल तर आपणास आवश्यक ते सर्व सहाय्य मिळू शकणार आहे.

 

जमीन विकणारे, एजंट, वकील, आर्कीटेक्ट व जमीनीची कामे करणारे कंत्राटदार यांची जिल्हा/तालुक्यानूसार सूची तयार करून या वेबसाइटवर ठेवली जाणार आहे.

 

या वेबसाइटचा मुळ उद्दीष्ट  आपले जमीन विषयक व्यवहार सूरळीत करावयाला मदत करणे हा आहे. हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी ही वेबसाइट स्थावर मिळकतीच्या व्यवहारात असलेल्या व्यक्ति, कंपन्या आणि व्यवसायीक यांना एकत्र आणणार आहे हे सर्व घटक एकमेकाच्या सहाय्याने आपल्या ज्ञानाची आणि व्यवसायाची   वृध्दी करतील असा माझा विश्वास आहे.

 

определение местонахождения тут ответы меил ру гдз тетрадь по английскому биболетова база данных квартирных телефонов здесь решебник по where is cell phone location на сайте база телефонная кирова на сайте Поиск гражданок россии sitemap